नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी : सोलापूरचा महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी

पुणे(प्रतिनिधि)-मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नांदेडच्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. अत्यंत उत्कंठा निर्माण करणाऱ्या लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले आणि मैदानावर एकच जल्लोष झाला. महाराष्ट्र राज्य […]

Read More

महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत : माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव

पुणे-महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा दावेदार असून त्यामध्ये […]

Read More

गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाहेर

पुणे—महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (maharashtra kesari) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील (pruthviraj patil) याला पराभवाचा धक्का बसला आहे. पुण्याच्या हर्षद कोकाटे (harsahd kokate) कडून जोरदार पराभव झाल्याने पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. तवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि पुणे शहराचा पैलवान हर्षद कोकाटे यांच्यात […]

Read More

६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन : कुस्तीगिरांचा सर्वांगीण विकास सरकारच्या प्राधान्यावर- चंद्रकांत पाटील

पुणे–“आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चंद्रकांतदादा […]

Read More

मंगळवारपासून भरणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा आखाडा : ‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस

पुणे–प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती (maharashtra kesari) स्पर्धेचा थरार मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून, ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, […]

Read More

‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार

पुणे-महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असल्याचा आनंद असून, कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. […]

Read More