जागतिक महिला दिनानिमित्त पॅरामोटर्सच्या साह्याने पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग : गिनीज बुकसाठी करणार नोंद


पुणे- जागतिक महिला दिनानिमित्ताने पद्मश्री शीतल महाजनने पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून स्कायडायव्हिंग केले. हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी मारली.यावेळी पुण्यातील उद्योगपती पॅरामोटर्सच्या साहयाने देशविदेशात वेगवेगळे रेकॉर्ड करणारे विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलाटची जबाबदारी पार पडली.आज रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शीतलने हे स्कायडायव्हिंग केले.


जागतिक महिला दिनानिमित्त रात्रीच्या वेळी पॅरामोटर्सच्या साह्याने स्कायडायव्हिंग करण्याचे शीतलचे स्वप्न होते. परंतु रात्रीच्या वेळी स्कायडायव्हिंग धोकादायक असल्याचे कारण दाखवून अनेक पॅरामोटर्स पायलटने नकार दिला.अखेर विजय सेठी यांच्याशी शीतलने संपर्क साधला.सेठी यांनी तत्काळ होकार दिल्याने आज शीतलचे स्वप्न साकार झाले.
5 हजार फुटावरून पुणे शहर  पाहण्याचा आंनद काही निराळाच असल्याचे शीतलने सांगितले आजचा अनुभव थरारक असल्याचेही शीतल आणि विजय सेठी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती' : जिद्दी सविता