उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे (प्रतिनिधी)–पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणारTraffic from North India to South will be diverted from Surat via Nashik, Nagar, Salelapur. असल्याचे केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पुणे शहरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा गडकरी यांनी आज पुण्यात घेतला. यानंतर ते पत्रकार परीषदेत बाेलत हाेते. पुण्यातील चांदणी चाैकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुल आणि इतर पर्यायी रस्त्यांच्या कामांची पाहणी गडकरी यांनी केली.

गडकरी म्हणाले, ‘‘ पुणे ते नगर रस्त्यावर वाघाेली , शिक्रापुर या भागात माेठ्या प्रमाणावर वाहतुक काेंडी हाेत असते. या रस्त्यावरील ताण लक्षात घेऊन येथे दुहेरी उड्डाणपुल बांधून त्यादृष्टीने डिझाईन तयार करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार ४७ किलाेमीटर लांबीचा दुहेरी उड्डाणपुल उभारण्याची याेजना आहे. यामध्ये रस्त्यावर चार पदरी, त्याच्या पहील्या मजल्यावर चार पदरी आणि वरच्या मजल्यावर सहा पदरी रस्ता तयार केला जाईल. थेट नगरच्या दिशेने जाणारी वाहतुक सर्वांत वरच्या स्तरावरून केली जाईल. दुसऱ्या मजल्यावरुन खाली उतरण्यास काही ठीकाणी ते रस्ते खाली उतरविले जाणार आहे. यामुळे वाघाेली ते शिक्रापुर या भागातील वाहतुक सुरळीत हाेईल. तसेच शिक्रापुर ते नगर आणि तेथून पुढे औरंगाबादपर्यंत याचप्रकारचे मार्ग करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. दुहेरी उड्डाणपुलासाठी सुमारे सहा हजार काेटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे’’ असेही त्यांनी नमूद केले.


सध्या मुंबई ते दिल्ली या मार्गाचे एकशे वीस मीटरपर्यंत रुंदीकरण केले जात आहे. त्यासाठी एक लाख काेटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करीत, गडकरी म्हणाले, ‘‘ उत्तर भारतातून दक्षिण भारतातील बंगळूर, चेन्नई आदी शहरांकडे जाणारी वाहतुक मुंबई आणि पुण्यातून पुढे जाते. त्याचा ताण या शहरालगत असलेल्या महामार्गावर येताे. आता ही वाहतुक सुरत ते नाशिक तेथून पुढे नगर, साेलापुर मार्गाने दक्षिणेकडे वळविण्यासाठी मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी पंचवीस हजार काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भुसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.’’

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *