जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर

पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी( प्रतिनिधी) :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत ‘ती’चा जागर करीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर, वकिल, शिक्षिका, गायिका, खेळाडू व सैनिक अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून स्वतःच्या क्षेत्राविषयी माहिती सांगितली.

यानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील ताई यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावे़ळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया मेनन, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका नीलम पवार, शिक्षिका ललिता गिल, सोनिया गुरूंग, सुमित्रा कुंभार, सुनिता ठाकूर, सुषमा शेरावली, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरती राव यांनी यावेळी बोलताना सांगितले, आजची महिला अबला नसून, ती सबला आहे. तसेच ‘ती’ फक्त स्वतः बदलत नाही, तर सोबत समाजामध्येही मोठा बदल घडवत असते, हे दुर्लक्षून चालणार नाही. विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले पाहिजे. तसेच त्यांनी सशक्त बनले पाहिजे. आज कुठलेही क्षेत्र असे नाही, की स्रिया पुरुषांच्या मागे राहिलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 आशा घोरपडे म्हणाल्या, की विविध क्षेत्रात स्त्रियांनी उच्च स्थान प्राप्त केले आहे, त्यापैकीच संस्थेच्या अध्यक्षा आरती राव आपणापुढील मोठा आदर्श आहेत. हर्षा बांठिया यांनी महिलांचे समाजातील स्थान व सबलीकरण याविषयी मार्गदर्शन केले. प्रिया मेनन यांनी विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचा उल्लेख करीत माहिती दिली. शिक्षिका ललिता गिल यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षिका सुषमा शेरावली यांनी गीत सादर करीत वातावरण भारावून टाकले.   

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका सोनिया गुरूंग, सुमित्रा कुंभार, यांनी, तर आभार शिक्षिका सुनिता ठाकूर यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *