#Sharad Mohol Murder Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held
1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

Sharad Mohol Murder Case: कुख्यात गुंड (Gangstar) शरद मोहोळ(Sharad Mohol) याचा खून(Murder) प्रकरणात गुन्हे शाखेने(Crime Branch)  आणखी तीन जणांना अटक(Arrest) केली असून त्यांना शनिवारी न्यायालायत(Court)  हजर करण्यात आले होते.न्यायालयाने त्यांना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी(Police Custody) सुनावली आहे.

नितीन अनंता खैरे (वय – ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. संतोष कुरपे हे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या केंद्र सरकाराच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 

अधिक वाचा  अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्रात 'हर घर भगवा ध्वज' अभियान : विश्व हिंदू परिषद मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क विभाग यांच्या वतीने आयोजन

यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली.

खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे  उपस्थित होते.  मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला करून सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा असे सांगितले होते.

अधिक वाचा  सौ. वेदंगी तिळगुळकर ठरल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल

मोहोळचा खून करण्यासाठी ४ पिस्टल आणण्यात आले होते. त्यातील ३ पिस्टल जप्त करण्यात आले आहे. यातील १ पिस्टल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपीचा सोबत तपास करायचा असल्याने ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती. त्याला विरोध करतांना आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली. यावेळी ऍड दोडके यांनी न्यायालयात सांगितले की, संतोष कुरपे यांना अनओळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा गेलं केला असून मास्टरला सांगा असे सांगितले. तसेच पोलिसांनी चौकशीसाठी ११ जानेवारीला बोलावले होते. त्यावेळी माहिती दिल्याने कमीत कमी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.             

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love