#Prabha Atre : जेष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन

Senior talented singer, music composer, writer, professor Dr. Prabha Atre passed away
Senior talented singer, music composer, writer, professor Dr. Prabha Atre passed away

Dr.Prabha Atre Passed Away : जेष्ठ प्रतिभावंत गायिका(Senior talented singer), संगीत रचनाकार(Music Composer), लेखिका(Writer), प्राध्यापिका(Professor) व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘स्वरयोगिनी’ (Waryogini) डॉ. प्रभा अत्रे(Dr. Prabha Atre) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालविली होती.  डॉ. प्रभा अत्रे यांच्या पश्चात त्यांच्या भाच्या मनिषा रवी प्रकाश(Manisha Ravee Prakash), कल्पना वैद्य (Kalpana Vaidya) तसेच शिष्य परिवार आहे. (Senior talented singer, music composer, writer, professor Dr. Prabha Atre passed away)

डॉ. प्रभा अत्रे यांची अमेरिकेत असणारी भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

डॉ. प्रभा अत्रे यांचे ख्याल गायकीसोबत ठुमरी(Thumri) , दादरा(Dadra), गझल(Ghazal), उपशास्त्रीय संगीत(ecclesiastical music), नाटय़ संगीत(Drama Music), भजन (bhajan) व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या सध्या युटय़ूबच्या माध्यमातून काम करत होत्या. अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या.

अधिक वाचा  प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच- उदय सामंत

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांचे पोटी झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. विधी महाविदयालयातून कायद्याची पदवी संपादन केली. गांधर्व महाविद्यालयातून स्नातकोत्तर पदवी घेतली. ‘सरगम’बद्दल त्यांनी संशोधनही केले. लंडनमधील ट्रिनिटी म्युझिक कॉलेजमधून पाश्चात्य संगीत श्रेणीचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी कथक नृत्यशैलीचेही औपचारिक शिक्षण घेतले. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वषी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये साथ करत असत.

भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करायच्या. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.

प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप – मल्हार, तिलंग – भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत होत्या. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.

अधिक वाचा  #कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यासह सात जणांना अटक : बार चालक आणि कर्मचारी यांची २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

डॉ. प्रभा अत्रे यांचे लेखन

डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक ‘स्वरमयी’ असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या ‘सुस्वराली’ (१९९२) या दुसऱ्या पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व स्वररंजनी (इ.स. २००६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५००  शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. त्यांचे पाचवे पुस्तक, ‘अंतःस्वर’ हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.

प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील ‘एनलायटनिंग द लिसनर’ (इ.स. २००० ) व ‘अलाँग द पाथ ऑफ म्युझिक’ (इ.स. २००६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत. 

अधिक वाचा  इंद्रायनी नदी पुन्हा फेसाळली

 पुस्तक प्रकाशनाचा विक्रम

डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८  एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.

 डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेले पुरस्कार

भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल  १९९० मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. आचार्य अत्रे संगीत पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार, पुण्याच्या ब्राह्मण जागृती सेवा संघाचा समाजभूषण पुरस्कार, ‘पु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, पुण्यभूषण पुरस्कार असे अनेक विविध पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे यांना संगीत क्षेत्राची सेवा केल्याने मिळाले आहेत. 

 प्रभा अत्र्यांच्या नावाने पुरस्कार

२०११ पासून तात्यासाहेब नातू ट्रस्ट व गानवर्धन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत साधना करणाऱयांना प्रभा अत्र्यांच्या नावाचा ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे राष्ट्रीय शास्त्रीय संगीत पुरस्कार’ प्रदान करण्यास सुरुवात झाली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love