ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर  यांचं निधन

Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away
Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away

पुणे- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर  यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ  येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. (Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away)

दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. 

अधिक वाचा  भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love