लघु व मध्यम उद्योगांसाठी आत्मनिर्भर भारत व्हर्च्युअल प्रदर्शन:’अॅब्लिएक्सपो’च्या प्लॅटफॉर्मवर


पुणे – कोव्हिड-१९ महामारीमुळे देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे अनेक लघु व मध्यम उद्योजक हे त्यांच्या मार्केटिंगसाठी तरतूद करण्यास धजावत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक प्रगती खुंटल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, लघु व मध्यम उद्योजकांना परिणामकारक आणि परवडणारे असे मार्केटिंगसाठीच्या व्यासपीठाची गरज आहे ज्याद्वारे ते देशांतर्गत व जागतिक पातळीवरील ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतील. बी२बी प्रोमोशनसाठी पद्धतशीरपणे आणि योग्य दिशेने प्रयत्न करून आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. अॅब्लिएक्सपो या मेड इन इंडिया प्लॅटफॉर्मवर या इव्हेन्टचे सादरीकरण २१ मार्च २०२१ पासून होणार आहे.  

चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देत लघु व मध्यम उद्योगांना पुन्हा उभे राहण्यास मदत करण्यासाठी इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे यांनी एमएसएमई मंत्रालयाच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून  व्हेन्डर  डेव्हलपमेंट  व व्हर्च्युअल प्रदर्शन आणि एमएसएमईच्या क्षमतांचे सादरीकरण करणारा उपक्रम हाती घेतला आहे.   आत्मनिर्भर भारत व्हर्च्युअल प्रदर्शनाच्या माध्यमातून संबंधित जागतिक कंपन्यांच्या भेटीसह इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, कोकण रेल्वे अशा देशांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर व्हर्च्युअल व्हेंडर डेव्हलपमेंटची संधी मिळणार आहे. या कंपन्या त्यांच्या पाचशेहून अधिक उत्पादनांसाठी व्हेंडरची निवड करणार आहेत. त्यामुळे प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या एमएसएमईंना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची आणि सादरीकरणाची संधी ऑनलाईन व्हर्च्युअल बूथच्या माध्यमातून मिळणार आहे.

अधिक वाचा  आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग

हा उपक्रम  ब्ल्यूमार्क सॉफ्टवेअर प्रा. लि.चे  सीईओ गोविंद सदामते आणि एमडी संजय लांडगे,  श्री अभय दफ्तरदार (उपसंचालक, एमएसएमई विभाग) आणि श्री सागर जाधव (संचालक, इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे) आणि श्री प्रदीप पेशकर (केंद्र सरकारच्या एमएसएमई नॅशनल बोर्डचे सदस्य) हे संयुक्तपणे राबविणार आहेत. आत्मनिर्भर भारत प्रदर्शनामध्ये  इंडस्ट्रिअल सप्लाय एक्स्पो, इंजिनिअरिंग आणि इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स एक्सपो, पॅकेजिंग एक्स्पो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्राॅनिक्स एक्सपो इ. क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे आणि केंद्र सरकारच्या एमएसएमई विभागातर्फे सर्व एमएसएमईंना   आत्मनिर्भर भारत व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये सहभागी   इच्छुक एमएसएमई   ९३५६००२७०१ / ८०८०८४८५६५ या क्रमांकावर किंवा [email protected] या इमेलद्वारे किंवा www.abli-expo.com या संकेतस्थळाद्वारे संपर्क साधू शकतात.

ब्ल्यूमार्क सॉफ्टवेअर प्रा. लि. चे सीईओ गोविंद सदामते म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये चार प्रदर्शनांचे आयोजन वर्षभराच्या कालावधीत केले आहे. भारतीय तसेच विदेशी बाजारपेठेतून खात्रीशीर कंपन्या व्हर्च्यअल स्टॉल्सला भेट देणार आहेत  पीएसयूचे व्हेंडर रेजिस्ट्रेशन हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे आणि संबंधित पीएसयूने त्यांच्या व्हर्च्युअल स्टॉलच्या माध्यमातून पात्रतेचे निकष, नोंदणीची प्रक्रिया आणि विकसित करावयाची उत्पादने याची यादी नमूद केली आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या एमएसएमईंना पीएसयूंच्या स्टॉलला भेट देता येणार असून त्याद्वारे संभाषण करणे, कार्ड एक्सचेंज करणे, व्हीडिओ कॉन्फरन्स आयोजित करणे शक्य होणार आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love