पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: सर्जेराव जाधव यांची प्रचारात आघाडी

राजकारण
Spread the love

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारी शिक्षक संघटना आहे. सर्जेराव जाधव हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे मार्गे लावले आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे अनेकदा आंदोलने, उपोषणे करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. सन 2009 पासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता मिळत नव्हत्या. तसेच त्यांना पगारही मिळत नव्हता. त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. सोलापूर जिल्ह्यात मान्यता शिबिर लावून जिल्ह्यातील 367 शिक्षकांना व रयत शिक्षण संस्थेच्या 56 शिक्षकांना मान्यता देण्यास भाग पाडले. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करण्यासाठी शासन आदेश काढण्यात प्रयत्न करून अनेक शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता मिळवून दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या अनुकंपा तत्वावरील शिक्षक आणि लिपिक यांना मान्यता मिळवून दिल्या. तसेच बऱ्याच संस्थांमध्ये वाद असल्याने शाळा चालवण्यासाठी समन्वय साधून प्रशासकीय काम करण्यास मदत केली. विनाअनुदान तत्त्वावर बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे ठिय्या आंदोलन व उपोषण करून मान्यता देण्यासाठी भाग पाडले. अनेक शिक्षकांची उच्च न्यायालयात प्रकरणे असल्याने शिक्षण विभागाला शासन परिपत्रकानुसार सुनावणी घेऊन मान्यता देण्यास भाग पाडले.

सर्जेराव जाधव यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. कुणाच्या दबावाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाचे लेबल न लावता केलेल्या कामावर भर देत आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यात आपण वीस वर्षे खर्च केले आहेत, त्यामुळे सामान्य शिक्षक आपल्यालाच मतदान करतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *