पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश

20 candidates from Congress are interested for Pune Lok Sabha
20 candidates from Congress are interested for Pune Lok Sabha

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची (Pune Loksabha Election) काँग्रेसमधील (Congress)  20 इच्छुकांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांमध्ये आमदार रवींद धंगेकर (,, माजी आमदार मोहन जोशी(Mohan Joshi), माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर(Balasaheb Shivarkar),  कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी(Gopaldada Tiwari)  माजी आमदार अनंत गाडगीळ(Anant Gadgil), दीप्ती चवधरी (Dipti Chavadhari), महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी(Sangita Tiwari)  व शहराध्यक्ष अरविंद शिंदे(Arvind Shinde)  यांचाही समावेश आहे.( 20 candidates from Congress are interested for Pune Lok Sabha)

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना महाविकास आघाडीच्या बैठकांचेही  सत्र सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ समन्वयकपदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहर काँग्रेसने हे आदेश पारित केले होते. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झाले नसले, तरी परंपरेनुसार ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यानुसार काँग्रेसने या जागेवर  पहिल्यापासूनच दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे. 

अधिक वाचा  तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल : कोण आणि का म्हणाले?

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले असून, 20 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला धूळ चारणाऱया रवींद्र धंगेकर यांचाही इच्छुकांमध्ये समावेश असल्याचे दिसत आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ऍड. अभय छाजेड(सरचिटणीस,म.प्र.कॉ.क.) (Abhay Chajed)  , संजय बालगुडे(Sanjay Balgude), आबा बागूल(माजी उपमहापौर) (Aba Bagul), दत्ता बहिरट(Datta Bahirat), गोपाळ तिवारी(Gopal Tiwari(Virendra Kirad), संगीत तिवारी(Sangita Tiwari) , नरेंद्र व्यवहारे(Narendra Vyavhare), यशराज पारखी(Yashraj Parkhi), मुकेश धिवार(Mukesh Dhiwar), राजू नागेंद्र कांबळे(Raju Nagendra Kambale), मनोज पवार(Manoj पवार), संग्राम खोपडे(आर. जे.)(Sangram Khopade) , दिग्विजय जेधे (Digvijay Jedhe) आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 

 अविनाश बागवे यांचा अर्ज थेट प्रदेशाध्यक्षांकडे?

दरम्यान, या २० जणांमध्ये माजी शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagave) किंवा माजी नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Bagave) यांचा समावेश नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अविनाश बागवे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेस भवनला अर्ज न भरता आपला अर्ज थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. यावर आता प्रदेश कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love