संजय राठोड अजूनही मंत्रीपदावर कायम?


मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आंदोलने करीत सरकारवर दबाव आणला. तसेच जर राजीनामा घेतला नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना तोंड उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठविला नाही त्यावरूनही पुन्हा राजकीय गदारोळ झाला होता तर त्यावर  संजय राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी घेतलेला नाही असे प्रतिउत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना दिले होते.

असे असतानाही आजपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यावरून पुन्हा राजकीय रणकंदन माजण्याची शक्यता आहे. राठोड यांच्या राजीनाम्याचे पुढे काय झाले, ते मंत्रीपदावर अजुनही कायम आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ  लागले आहेत. राठोड यांनीही राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देताना, राजीनामा पुढे राज्यपालांकडे पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे बोलले जात आहे. राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द न केल्याने राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल असला तरी कायदेशीरदृष्ट्या ते अजूनही मंत्रीपदावर कायमच आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत : राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांनी संघटित व्हायला हवे