गँगस्टर निलेश घायाळच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या


पुणे–घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टर निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर)यांच्या पुणे ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याल  एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ यांच्या विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एम.पी.डी.ए.) कायदयातंर्गत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेमार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर पुणे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्णय घेवून निलेश घायवळ यास एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिलेले आहेत.

अधिक वाचा  चक्क खोडरबरमध्ये लपवून आणले सोने: आठ लाख रुपये किमतीचे सोने जप्त

  घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यास पोलीस अधीक्षक यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून जामखेड जि.अहमदनगर येथून ताब्यात घेवून आजपासून एक वर्ष स्थानबध्द करणेसाठी येरवडा मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे.

 स्थानबध्द करण्यात आलेला गुन्हेगार निलेश घायवळ याचेविरुध्द यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, गंभीर दुखापत मारामारी असेपुणे  गंभीर स्वरुपाचे एकूण १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सुमारे ३ महिन्यापूर्वीच निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love