माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याची अफवा

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे  यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे.

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले. संजय काकडे हे सध्या त्यांच्या भूगाव येथील बांधकाम साईटवर तर उषा काकडे या घरीच असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणाले. 

काय आहे प्रकरण  

संजय काकडे यांचे मेव्हणे तसेच उषा काकडे यांचे बंधू युवराज ढमाले (वय 40) यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ढमाले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्या मध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिल्याबाबत मागील काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *