संभाजी विडी उद्योगावर गुन्हा दाखल: कोणामुळे आणि कशासाठी केला गुन्हा दाखल?


पुणे— छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर विडीसारख्या व्यसनाच्या पदार्थांना देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित विडी उद्योगाने संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर त्वरित थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. विडी हा व्यसनाचा पदार्थ आहे. त्यामुळे त्याला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढून टाका  या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संघनेतील काही पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित विडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केल्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले आहे.

शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे वाघिरे उद्योग समुहाच्या चेअरमन आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा  तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवधर्म फाउंडेशन चे दिपक काटे, मच्छिन्द्र टिंगरे, सुनील पालवे,  सागर पोमण, रवी पडवळ, दिनेश ढगे हे कार्यकर्ते पुरंदर किल्याच्या पायथ्याला चार सप्टेंबर पासून उपोषणाला बसले होते. ८ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता सासवड पोलिसांनी या उपोषण कर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली मात्र तरीही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

त्यानंतर त्यांना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या दरम्यान तहसीलदार रुपाली सरनोबत, पीआय हाके साहेब यांनी कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपोषण सोडण्याची मागणी केली. यावेळी उपोषण कर्त्यांनी संभाजी विडी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार कंपनीचे मालक आणि संचलक मंडळ यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, साखळी आंदोलनाची घोषणा करून शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

अधिक वाचा  मागासवर्ग आयोगावर दबाव असल्याची चर्चा

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन   छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. अशा प्रकारे गैरवापर करणे ही अक्षम्य चूक आहे अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनीही संबंधित कंपनीला खडसावले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love