नाटकांतून इतिहासाचा विपर्यास किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण कदापि होता कामा नये- शरद पवार

आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी
आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी

Sharad Pawar : –नाटक (Drama) हे निखळ मनोरंजनाचे साधन (A means of entertainment ) असले, तरी त्यातून ज्ञानदानाचेही काम झाले पाहिजे. त्याचबरोबर नाटके (Drama) ही वास्तववादी(realistic) व आशयप्रधान(substantive) असायला हवीत. नाटकांतून इतिहासाचा विपर्यास ( A distortion of history )किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण (Sublimation of evil tendencies) कदापि होता कामा नये, अशी अपेक्षा शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे  (Natya Sanmelan) स्वागताध्यक्ष(Welcome President) व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(Sharad Pawar) यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. (Dramas should never distort history or glorify bad attitudes)

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मावळते अध्यक्ष पेमानंद गज्वी, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मुख्य आयोजक भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. 

अधिक वाचा  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

 शरद पवार म्हणाले, ऐतिहासिक नाटके हा अतिशय संवेदनशील विषय आहे. ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र सोयीचा इतिहास दाखवणे, इतिहासाचा विपर्यास करणे आणि इतिहासातील काही खलप्रवृत्तींचे उदात्तीकरण करणे या गोष्टी थांबल्या पाहिजे. इतिहास हा वस्तुनिष्ठपणे मांडला पाहिजे. वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करते. आजच्या प्रेक्षकांना या नाटकात महाराज अधिक हतबल झाले आहेत, असे वाटते. नाटकाच्या शीर्षकात जाग म्हणजे उभारी, असा अर्थ ध्वनित असल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतने दाखवले आहे. हे नाटक मी दिल्लीत पाहिले आहे. सध्याचे प्रेक्षक कुटुंबकलहातले महाराज का दाखवले, असा प्रश्न विचारतील आणि त्याचे पुरावेही मागतील. हे पाहता ऐतिहासिक नाटकांची निर्मिती ही जबाबदारीने व्हायला हवी. 

अधिक वाचा  सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना

पवारांनी नाटय़कलेचा आढावाही घेतला. ते म्हणाले, कलेला हजारो वर्षांची परंपरा आहे. यामध्ये 64 कलांचा समावेश आहे. नाटक ही त्यातील अतिशय परिणामकारक कला आहे. भरतमुनींच्या या नाटय़कलेला सातवा वेद असे म्हटले जात होते. आनंद व मनोरंजन हे नाटकाचे प्रयोजन, असे भरतमुनी यांनी म्हटले आहे. परंतु, ज्ञानदान हेही नाटकाचे प्रयोजन होय. संस्कृत, प्राकृत नाटक, संगीत नाटक, हौशी, व्यावसायिक नाटक येथवर नाटकाचा प्रवास येऊन ठेपला आहे. आचार्य अत्रे, पुल, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, विजया मेहता, रत्नाकर मतकरी, मंगेश एलकुंचवार यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला वेगळे वळण दिले. नवीन तंत्रज्ञान, माध्यमांमुळे नाटकांपुढे आज आव्हान निर्माण केले आहे. अशा काळात दर्जा उत्तम ठेवला पाहिजे. मराठी रंगभूमी ओस पडू नये, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. हल्ली डिजिटल माध्यमातही नाटके सादर होतात. मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जिवंतपणा नसतो. नाटके आशयप्रधान व वास्तववादी असतील, तर त्याला प्रेक्षक राहीलच, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love