इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले : श्रीमंत कोकाटे


पुणे – महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील, “छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली”, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, खोटं पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले, (Raj Thackeray made misleading statements by distorting history) असा आरोप लेखक आणि वक्ते श्रीमंत कोकाटेंनी केला आहे.

राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. तसेच, शरद पवार हे प्रत्येक गोष्ट जात बघून करतात असा आरोप केला होता.  रायगडावरील समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पााहणार का?, असा सवाल करतच टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचे नाव काय मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला होता.

अधिक वाचा  कल्याणीनगर 'हीट अँड रन’ प्रकरण : देवेंद्र फडणविसांनी केली पोलिसांची पाठराखण ; म्हणाले.. बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोकाटे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली नाही. उलट त्यांनी समाधीच्या नावाखाली त्याकाळी ८० ते ९० हजार रुपये गोळा केले. त्यात लोकमान्य टिळकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप कोकाटेंनी केला आहे.

श्रीमंत कोकोटे पुढे म्हणाले की, ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर त्यांची समाधी बांधली, असे सांगतच त्यांनी इतिहासाचा दाखला देखील दिला आहे. त्यानंतर रायगड किल्ला हा पेशवांच्या ताब्यात गेला आणि महाराजांच्या समाधीकडे प्रचंड दुर्लक्ष झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 1869 ला महात्मा जोतिराव फुले यांनी शोधून काढली. तिचा जीर्णोद्धार केला, असे देखील कोकाटेंनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीची सगळी पाळेमुळे जेम्स लेनच्या पुस्तकांमध्ये आहे. रामदास हे महाराजांचे गुरु नसताना शिवाजी महाराज, जिजाऊंच्या सोबत दाखवण्याचा अत्यंत हलकट विकृत आणि ही शिकवण पुरंदरेनी केलेली आहे. अशा पुरंदरेचे राज ठाकरे पुन्हा पुन्हा समर्थन करत आहेत, अशी टीकाही कोकाटेंनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love