ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने एका युवकाचा मृत्यू


पुणे–मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.प्रचिकेत भगवान काळे (वय 32 पिंपरी चिंचवड) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरतत असताना हात सटकल्याने तो अंदाजे 200 फुट खोल दरीत पडला होता. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या दुर्घटनेत त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजली तेव्हा अनिकेत बोकील व दिपक पवार हे त्याच भागातील कळकराय येथे क्लायबींगसाठी रेकी करत होते. लगेचच ते ढाक भैरी येथील दरीकडे पोहचले. नंतर कामशेतचे अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, अविनाश केदारी हे देखील त्यांच्या मदतीला पोचले. पायऱ्यामुळे प्रचिकेतचे मित्र व इतर ग्रुपचे सदस्य पण खाली पोचले होते. पण मार लागल्याने काहीच क्षणात त्याचा श्वास थांबला होता. शिवदुर्गची टीम देखील सर्व साहित्यांची जुळवाजुळव करत ढाकच्या दिशेने निघाली. कामशेत पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची कल्पना दिली. तोपर्यत अनिकेत व दिपक ने हालचाल करुन बॉडी पॅक केली व वर खेचण्यासाठी सेट अप लावला.

अधिक वाचा  #Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

अशा प्रकारच्या रेस्कूला फार मोठी टीम लागते. टेक्निकल टीम  काम करते, मृतदेह पुढे उचलून गाडी पर्यंत आणने खुपच जिकीरीचे असते. आमचे सर्व सदस्य अष्टपैलू आहेत, जे दोन्ही बाजू संभाळून घेतात. आजच्या रेस्कूला इतरही ट्रेकर्स ग्रुपनी खुप सहकार्य केले असे अनिकेत बोकील यांनी सांगितले.

अनिकेत बोकील, दिपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले, रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतिष मेलगाडे, महेश मसणे, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नुतन पवार, ब्रिजेश ठाकुर ,अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी, सुनिल गायकवाड यांनी सदरचा रेस्कू मावळमधील कड्यावरून पडल्याने युवकाचा मृत्यू प्रचिकेतचा मृतदेह बाहेर काढला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love