शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन


पुणे–शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

 वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.

नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९५५ साली अर्थशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं होते.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे १९५४ – १९५७ दरम्यान प्राध्यापक आणि ‘कमवा व शिका’ या योजनेचे ते प्रमुख देखील होते. इस्लामपूर येथील १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. १९६२ साली पुणे विद्यापीठातूनच वकिलीचं शिक्षणही पूर्ण केले.

एन. डी. पाटील यांनी  १९४८ मध्‍ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. १९५७ मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस राहिले. १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य भूषविले. शेतकरी कामगार पक्षाचे १९६९- १९७८, १९८५-२०१० सरचिटणीस राहिले.

अधिक वाचा  देशाला कृषिमंत्री नसेल, तर देश कसा चालणार? - शरद पवार

१९५९ पासून रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते. शिवाजी विद्यापीठात एन. डी. पाटील हे पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२), सिनेट सदस्य (१९६५), कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८), सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८) ही ते हाेते. १९८५ पासून बेळगावमधील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. १९९० पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते.  १९९१ साली महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्‍हणून त्‍यांनी काम पाहिले.

१९७८-१९८० मध्ये राज्याचे सहकारमंत्री होते. १९८५-१९९० साली महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघ) राहिले. १९९९-२००२ मध्ये लोकशाही आघाडी सरकार निमंत्रक होते. महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते म्हणूनही एन. डी. पाटील राज्यात ओळखले जात होते.

एन. डी. पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. नांदेडमधील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाने १९९९ साली डी.लीट.पदवी देऊन गौरविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेदेखील २००२ साली डी.लीट देऊन गौरविले हाेते.

१९९८-२००० साली भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळ अध्यक्षपद,  तसेच २००१ साली परभणी येथे भरलेले विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद एन. डी. पाटील यांनी भूषविले. शिवाजी विद्यापीठाकडूनही त्यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते.

अधिक वाचा  पुण्यात प्रथमच गोयंका ग्लोबल एज्युकेशनने सुरू केले फिनलँड इंटरनॅशनल स्कूल

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

अधिक वाचा  कौशिक आश्रम’ म्हणजे सेवाव्रतींचा मुक्ताश्रम -भैय्याजी जोशी : पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केल्या भावना

समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love