एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन एसीबीच्या जाळ्यात

Medical college dean caught in ACB's net for accepting bribe of Rs 10 lakh for MBBS admission
Medical college dean caught in ACB's net for accepting bribe of Rs 10 lakh for MBBS admission

पुणे-पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Pune Municipal Medical Education Trust)अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) येथील अधिष्ठात्यास (Dean) एम.बी.बी.एस.च्या (m.b.b.s. )प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून (acb) रंगेहाथ पकडण्यात आले. (Medical college dean caught in ACB’s net for accepting bribe of Rs 10 lakh for MBBS admission)

आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय -५४ वर्ष, अधिष्ठाता (वर्ग-१)) (Ashish Shrinath Banginvar)असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार: दोघांना अटक

याबाबत तक्रार दाखल केलेल्या ४९ वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा  एनईईटी परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कैंप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्युशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगिनवार यांना मुलाचे एम.बी.बी.एस. च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीयेसाठी भेटले.त्यावेळी त्यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रुपये लाच मागणी  केली. याबाबतची  तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे केली. त्यानुसार तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, डीन आशिष बनगिनवार यांनी तक्रारदारयांच्या मुलाचे एम.बी.बी.एस. च्या प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रुपये लाच रक्कम म्हणून मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता १० लाख रुपये त्यांचे कार्यालयात स्वीकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

अधिक वाचा  उद्यापासून प्रार्थनास्थळात दर्शनासाठी जाताय?... ही आहे नियमावली

.याबाबत समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक  सुदाम पाचोरकर पुढील तपास करत आहेत.सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती एसीपी नितीन जाधव यांनी दिली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love