पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार'(Lokmanya Tilak National Award) यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. उद्या (१ ऑगस्ट) पुण्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्यातील राजकारणाच्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सर्व मंडळी एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे (Lokmanya Tilak Smarak Trust) पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Award) प्रदान करण्यात येईल. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असतील. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (ता. १) सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होईल. ‘लोकमान्य पुरस्कार’ सोहळानिमित्त मोदी-पवार तब्बल साडेआठ वर्षांनंतर एकाच मंचावर येत आहेत. याआधी हे दोन्ही नेते १४ फेब्रुवारी २०१५ रोजी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यानंतर तब्बल साडेआठ वर्षांनी असा योग जुळून आला आहे.

यात आणखी एक विशेष भाग म्हणजे, राष्ट्रवादीत बंड केलेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *