पुणे -पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे लोकार्पण करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलचे डॅा. आंबेडकर स्मारक, पुणे शहरा सह १०० स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन इत्यादी आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मेट्रो व इतर प्रकल्पांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आले होते. त्यानिमिताने आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी ,पुर्वी भूमिपूजने व्हावयाची परंतू ऊदधाटने व लोकार्पण लवकर होत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला कॉँग्रेसला लगावला. यावर आक्षेप नोंदवताना काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काँग्रेस च्या सत्तेच्या काळातच देश विकासाच्या मार्गावर असल्यामुळेच, आर्थिक महासत्ता व २१ व्या शतकातील ‘डीजीटल इंडीया’च्या रूपाने ऊभा असून, ‘आधार कार्ड’ ते ‘एटीएम सेवा’ देखील देशात मोदी सरकार येण्यापुर्वीच् स्थानापन्न झाल्याची नोंद देखील पंतप्रधानांच्या ठायी असावी, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. काँग्रेस-युपीए काळातील मान्यता प्राप्त ‘पुणे_मेट्रो’ ही नागपूर अगोदर मंजूर होऊन देखील, राजकीय कुरघोडीने ३ वर्ष विलंबाने आज मार्गी लागली,किंबहुना काँग्रेस काळातील केंद्र सरकारचे मेट्रोचे अनुदान कमी करत ते पुन्हा २०% वरून १०% वर आणले. तसेच स्वराज्यातील ‘अहमदाबाद मेट्रो’चा काय विस्तार झाला? याचे देखील मोदी – शहांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.
तसेच, पुणे शहरातील स्वातंत्र्य सेनानींचा ऊल्लेख करतांना त्यांनी अगोदर माहीती घ्यावयास हवी होती… अन्यथा वि. दा. सावरकर यांना त्यांनी ‘पुण्याचे’ व महात्मा गांधींचे गुरू डॅा. गोपाळकृष्ण गोखले यांना गोपाळकृष्ण देशमुख संबोधले नसते,अशी टिका देखील गोपाळदादा तिवारी यांनी केली.