एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा – जयप्रकाश छाजेड यांची मागणी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

मुंबई- एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासन सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी या पत्रकान्वये केला आहे.एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात जयप्रकाश छाजेड म्हणाले की, गणपती सणासाठी राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार व महागाई भत्ता दिला.गणपती काळात प्रवाशांची अहोरात्र सेवा करणाऱ्या  एस.टी. कर्मचाऱ्यांना सुद्धा आगाऊ पगार व महागाई भत्ता देण्याची मागणी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले असताना एस. टी प्रशासनाने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही उलट स्वच्छतेच्या ठेकेदारांची कपात केलेली दंडाची रक्कम परत करण्यासाठी रक्कम वापरल्याचा आरोप जयप्रकाश छाजेड यांनी केला आहे.त्यामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता दिला जातो तर एस.टी कर्मचाऱ्यांना फक्त २८ टक्के महागाई भत्ता दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.२०१९ पासून अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी तसेच अधिकारी यांचे सेवानिवृत्ती नंतरचे रजेची रक्कम वेतनवाढीचा फरक अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही.  स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची रक्कम दिलेली नाही.कर्मचाऱ्यांचे कोविड काळातील वैद्यकीय व प्रवास भत्ता बिले दिली जात नाहीत याबाबत एस.टी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून प्रशासन. मात्र, पैसा नसल्याचे सांगत आहेत.पैसा नसताना ठेकेदारांची रक्कम प्राधान्याने परत करण्यास महामंडळाकडे पैसा कुठून आला? असा सवाल जयप्रकाश छाजेड यांनी उपस्थित केला आहे..

एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून एस. टी. कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक तरतूद करावी अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) चे अध्यक्ष मा.आ. जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पत्राद्वारे केली आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *