Polycystic Ovarian Disease (PCOD),मधुमेह, उच्च रक्तदाब याप्रमाणेच बदलत्या जीवन शैलीमुळे होणारा स्त्रियांमधील सामान्य आजार…..


आजच्या 21 व्या शतकात स्त्रिया देखील पुरुषासोबत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवन शैलीमुळे स्त्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंब आणि व्यवसाय अथवा नोकरीची जबाबदारी पार पाडत असताना आरोग्याची साहजिकच हेळसांड होते. त्यामुळेच त्यांना अल्प वयात उच्च रक्त दाब, मधुमेह, स्थौल्य, थायरॉइड,  मासिक पाळीच्या तक्रारी इ.ना सामोरे जावे लागत आहे. अशाच मासिक पाळीच्या संबंधित PCOD या आजाराची माहिती घेऊयात.

साधारणतः 12- 45 या वयोगटातील स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो.आता याचे प्रमाण बरेच वाढत आहे. जवळ जवळ 10 – 20 % स्त्रियांमध्ये हा आजार दिसून येत आहे. यामध्ये स्त्रियांच्या बीजांडामध्ये लहान लहान पाण्याने भरलेल्या द्राक्षासारख्या गाठी असतात.

अधिक वाचा  वंध्यत्व समस्येवर उपाय; घराच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार पद्धती In-vitro (artificial insemination)

लक्षणें

अनियमित मासिक पाळी , अल्प/अति  प्रमाणात रजस्राव.

चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे लव  येणे (hirsutism ).

प्रयत्न करूनही वजन कमी  न होणे.

चेहऱ्यावर फोडी येणे.

केस गळणे (male pattern baldness ).

मानेवर काळसर पणा दिसणे ( acanthosis nigricans). रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे. ( hyperlipidemia).

थकवा असणे, जडपणा वाटणे.,वंध्यत्व. इ.

कारणे – बदलती जीवनशैली – अनियमित आहार,  फास्ट फूड (अतिस्निग्ध, उष्ण, लवण गुरु, आहार ), दुपारी  झोपणे, वेगावरोध करणे, चुकीची रजस्वला परिचर्या, यामुळे अग्निमांद्य होऊन दोष दुष्टी होते त्यामुळे रस धातूचा उपधातू रज असल्याने त्याची ही दुष्टी होते.

मानसिक हेतू  -अतिचिंता, शोक भय, ताणतणाव 

यामुळे शरीरातील पेशींच्या ठिकाणी इन्सुलिनला अवरोध  ( insulin resistance ) निर्माण होतो.  या वाढलेल्या इन्सुलिन मुळे पियुषिका ग्रन्थि च्या संप्रेरकामध्ये असंतुलन निर्माण होऊन या आजाराची निर्मिती होते.

अधिक वाचा  पुण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव : पहिला रुग्ण सापडला

-अनुवंशिकता 

निदानात्मक तपासण्या – सोनोग्राफी , थायरॉईड प्रोफाइल, हॉर्मोनल लेव्हलस, रक्त शर्करा, चरबीचे प्रमाण… इ.

PCOS मुळे होऊ शकणारे संभावित आजार  – Type  2 diabetes, hypertension, abnormal uterine bleeding, Obesity, endometrial cancer

उपचार  – PCOD ची कारणे व लक्षणें विचारत घेऊन डॉक्टर उपचाराची दिशा ठरवतात.  

व्यायाम – वजन कमी करण्यासाठीचे व्यायामाचे मार्गदर्शन करणे (  cycling, walking,  yoga ).

यामध्ये प्रथम वमन, बस्ती, उत्तरबस्ती सारखे पंचकर्म करून शोधन करून त्या पश्चात शमन चिकित्सा चालू  करावी. त्यामध्ये रजस्राव नियमित करणारी तसेच गर्भाशयाला ताकत देणारी औषधे  पोटातून द्यावयास चालू करावीत .

आधुनिक शास्त्रानुसार  व्यायाम , आहार  आणि त्याबरोबरच  oral contraceptive pills तसेच metformin सारख्या मधुमेह आजारामध्ये वापरल्या जाणाऱ्या  औषधांचा वापर केला जातो.

अधिक वाचा  चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे होणाऱ्या ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन

विशेष सल्ला  – नियमित व्यायाम , संतुलित आहार , पुरेशी झोप या त्रिसूत्रीच्या आधारे PCOD या आजारापासून आपण स्वतःला वेगळे ठेवू शकता. ,  त्याचबरोबर बऱ्याच वेळा सोनोग्राफी मध्ये PCOD असे निदान झाले नसेल  आणि तरीही वरील लक्षनांपैकी काही लक्षणे असतील तर ती दुर्लक्षित करून चालणार नाही कारण ही PCOD या आजाराची पूर्वरूपे असू शकतात. म्हणून अशी लक्षणे दिसणाऱ्या मुलींच्या पालकांनी गाफिल राहू नका. भविष्यात याचा त्रास वाढण्यापेक्षा लवकर उपचार करून त्यांचे जीवन आरोग्यमय आणि सुखकर करा

 Dr. Prajakta Sanjay Gaikwad ,

Niramay clinic ,Pune. 9881928175

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love