एस्ट्राझेनेकाच्या डॅपग्लीफ्लोझीनला भारतात किडनीच्या उपचारांसाठी वापरण्यास मान्यता

आरोग्य
Spread the love

पुणे : एस्ट्राझेनेका इंडिया (एस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या मधुमेहावरील डॅपग्लीफ्लोझीन या औषधला तिसऱ्या स्टेजपर्यंत गंभीर किडनी आजार Severe kidney diseaseअसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी भारतामध्ये मान्यता मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.AstraZeneca’s Dapglyflozine approved for use in the treatment of kidney disease in India ही मान्यता मिळाल्यामुळे भारतातील नेफ्रोलॉजिस्ट्सना डॅपग्लीफ्लोझीन टॅबलेट्स (१० मिली ग्रॅम) एका नव्या आजारावरील उपचारांसाठी वापरण्याचा मार्ग खुला झाला आहे.

एस्ट्राझेनेकाचे डॅपग्लीफ्लोझीन हे त्याच्या श्रेणीतील पहिले औषध आहे जे गंभीर किडनी आजार असलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे निष्कर्ष हाती लागले आहेत असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. अभ्यासातून असे आढळून आले आहे की, डॅपग्लीफ्लोझीनमुळे टाईप-२ मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या रुग्णांमध्ये गंभीर किडनी आजाराची वाढ कमी करण्याच्या बाबतीत लक्षणीय लाभ मिळतात. डीएपीए-सीकेडी अभ्यासाचा प्रभाव आणि सुरक्षेच्या आधारे ३० मार्च २०२० रोजी जागतिक स्तरावर हे निष्कर्ष काढले गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गंभीर किडनी आजार (सीकेडी) ही नव्याने निर्माण होत असलेली, सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.  २०१५ च्या जागतिक आजार भार अहवालानुसार मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या आजारांच्या यादीत सीकेडीचे स्थान १२ वे होते, दहा वर्षात मृत्युदरामध्ये ३७.१% वाढ झाली आहे.  ही एक अतिशय गंभीर आणि सातत्याने अधिक वाढत जाणारी स्थिती असून यामध्ये किडनीचे कार्य बिघडते किंवा किडनी निकामी होते.  जगभरातील जवळपास ७० कोटी लोकांना हा आजार असून त्यांच्यापैकी कितीतरी लोकांच्या बाबतीत अद्याप आजाराचे निदान झालेले नाही.  भारतात सीकेडीचे प्रमाण १७.२% असावे असे अनुमान आहे, ज्यानुसार रुग्णांची संख्या १ बिलियन असावी. सीकेडीचे वाढते प्रमाण हे येत्या काळामध्ये आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था या दोन्हींसाठी खूप मोठी समस्या निर्माण करू शकते.  वाढता मृत्युदर आणि हृदय बंद पडणे यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी धोक्यांमध्ये वाढ आणि अकाली मृत्यू यांच्याशी सीकेडीचा अतिशय निकट संबंध आहे.  सीकेडीमुळे उद्भवणारे काही गंभीर धोके किंवा त्याच्याशी संबंधित समस्या यावर काही उपचार, औषधे जरी उपलब्ध असली तरी मूत्र आजारांची वाढ रोखण्यावर थेट प्रभाव करण्याची क्षमता त्यांच्यापैकी फारच कमी औषधांमध्ये आहे.

डीएपीए-सीकेडी ही पहिली चाचणी आहे ज्यामध्ये टाईप-२ मधुमेह असलेल्या व नसलेल्या सीकेडी रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यानंतर सुधारणांसहित प्रभाव दिसून आला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एस्ट्राझेनेका इंडियाचे मेडिकल अफेयर्स अँड रेग्युलेटरी विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल कुकरेजा यांनी सांगितले, भारतात सीकेडीवरील उपचारांमध्ये डॅपग्लीफ्लोझीनच्या वापराला मंजुरी मिळाल्यामुळे आधीच प्रभावी असलेले टाईप-२ मधुमेहावरील आणि हृदयविकारांवरील निवडक उपचार हे आता नेफ्रोलॉजिस्ट्स गंभीर किडनी आजारांवरील उपचारांच्या व्यवस्थापनामध्ये देखील वापरू शकतात.  गंभीर किडनी आजाराच्या व्यवस्थापनामध्ये इतका अभूतपूर्व प्रभाव दर्शवणारे डॅपग्लीफ्लोझीन हे पहिले एसजीएलटी२ इन्हिबिटर आहे.  

भारतात डीएपीए-सीकेडीचे नॅशनल लीड इन्वेस्टीगेटर डॉ. दिनेश खुल्लर यांनी सांगितले, डॅपग्लीफ्लोझीन या एसजीएलटी२ इन्हिबिटरवर करण्यात आलेल्या संशोधनातून टाईप-२ मधुमेह आणि निवडक प्रकारचे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थापनामध्ये हे औषध प्रभावी असल्याचे पुरेसे निष्कर्ष आढळून आलेले आहेत.  मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये सीकेडीची वाढ रोखण्यासाठी याचा सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो.  भारतामध्ये मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंतीचे व्यवस्थापन करण्यात हे औषध अनेक मोठे बदल घडवून आणू शकेल.  भारतातील नियामक संस्थांनी याला मान्यता दिली हे अतिशय स्वागतार्ह असून मधुमेह असलेल्या, नसलेल्या तसेच ज्यांच्याबाबतीत सीकेडी आजार आधीच बराच वाढला आहे अशा रुग्णांसाठी देखील हे लाभदायक ठरणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *