भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची राष्ट्रवादीकडून घोषणा: व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास मिळणार हे बक्षीस


पुणे-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास बक्षीस देखील दिली जाणार आहेत.

२०१७ पर्यंत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी सत्ता भाजपच्या हाती दिली. पण मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यात अपयश आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दांडेकर पूल येथे कालवा फुटीची घटना, शहरात अनेक भागात खड्डे, यासारख्या समस्या असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांसारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. यासह अनेक प्रश्नावर अनेक वेळा सभागृहात किंवा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाची पोलखोल स्पर्धा जाहीर केली आहे. संबधित व्यक्तीने आपल्या परिसरातील समस्या व्हिडिओ किंवा फोटो #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या व्हिडिओ आणि सेल्फी फोटोला प्रत्येकी ११,१११ रुपये, असे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, नाना तुमच्या प्रामाणिकतेला पैशाने हरविले