‘मेरे को क्लिप मिली, मैने सुनी, मुझे तो आम से मतलब है, किससे मिली क्या मतलब?- चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाशिक येथील ‘स्टँडिंग चर्चे’नंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी क्लिप्स मिळाल्याचे संगीत होते. परंतु, मी क्लिप्स पाठवलेल्या नाहीत असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी ‘मेरे को क्लिप मिली, मैने सुनी, मुझे तो आम से मतलब है, किससे मिली क्या मतलब? असं सूचक विधान केल्याने भाजप – मनसे युतीची शक्यता बळावली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, ‘राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एकदोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे. मी ती क्लिप ऐकली आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर ठेवेन. मुझे तो आम से मतलब है. किससे मिली क्या मतलब? असं सूचक विधान करतानाच मेरे को क्लिप मिली. मैने सुनी. पण युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, असं ते म्हणाले.

मनसेच परप्रांतीयांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर मी ओके देईन, असं त्यांनी थेट सांगितलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. विशेष म्हणजे ही युती पालिका निवडणुकांसाठी राहणार नसून लोकसभा आणि विधानसभेतही राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात आणि राज-चंद्रकांतदादांच्या भेटीत नेमकं काय ठरतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

प्रसाद लाड यांच्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, “प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असून आता तो विषय संपला आहे”. महाराष्ट्रची ही संस्कृती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की,”काहीही बोलाल का? ते मानसिक संतुलन बिघडले असे म्हणतात. काही सूचना केल्या तरी ते बोलतात. आदित्य ठाकरे बोलत नव्हते ते आता बोलायला लागले”. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालाची खुर्ची सोडून बोलावे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “राज्यपाल यांच्यावर काहीही बोलायची परंपरा सुरू झाली आहे. त्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. ते पद मोठे असून नाना पटोले आणि राज्यपाल यांनी काय बोलावे हे मी सांगू शकत नाही”.

खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार

“खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे. घोषणा करायची, मात्र काही अंमलबजावणी करायची नाही; याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याच्याबाबत विधानसभेत करण्यात आलेली घोषणा. शब्द दिला पण तो शब्द पाळला नाही. प्रत्येक विषयावर थापा मारणार का?”, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं होतं, पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहे, याकडे चंद्रकात पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजवर अनेक वेळा म्हटलं की, अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अजित पवारांसारखा शब्दाला पक्का माणूस नाही. पण आता शब्द पाळायला हवा होता, मात्र त्यांनी शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे”, असं पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *