पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा कॉँग्रेसकडून निषेध

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता […]

Read More

पुणे महानगरपालिका जिंकण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न उध्वस्त होईल – चंद्रकांत पाटील

पुणे–पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत […]

Read More

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

पुणे– पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ही माहिती परिपत्रकाद्वारे पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे […]

Read More

भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची राष्ट्रवादीकडून घोषणा: व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास मिळणार हे बक्षीस

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास बक्षीस देखील दिली जाणार आहेत. २०१७ पर्यंत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी सत्ता भाजपच्या हाती दिली. पण मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून […]

Read More

सुनावणी दरम्यान न्यायालयाने लावला फोन: कंट्रोल रूमचे पितळ उघडे

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येत असलेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी सुरू असताना बुधवारी न्यायाधीशांनीच स्वत: कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेडचे नियोजन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला फोन लावला आणि त्यांना बेड शिल्लक असताना एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पितळ […]

Read More

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

पुणे – रा.स्व.संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने   कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली. पी.पी.सी.आर ( Pune Platform for covid responce), सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान […]

Read More