पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात यावर पुस्तक लिहावे- शरद पवार

What is Narendra Modi cheese?
What is Narendra Modi cheese?

पुणे- ‘मी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्या पुस्तकाची वाट बघतो आहे. त्यात त्यांनी ईडीचा चॅप्टर (ed Chapter) पण लिहावा. दिल्लीतील त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का ताब्यात घेतले? तेही त्यांनी लिहावे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना लगावला. (Patel should write a book on why people leave the party)

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase), अनिल देशमुख(Anil Deshmukh), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil ) आदी नेते  उपस्थित होते.

कर्जतमध्ये मंथन शिबिरात बोलताना खासदार प्रफुल पटेल (Prafulla Patel) यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचे  म्हटले होते. त्यावर शरद पवार म्हणाले, पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. प्रफुल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर पुस्तक लिहावे. ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावे.

अधिक वाचा  शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर अंजली दमानिया यांच्या ट्वीटची चर्चा..

२००४ मध्ये भाजपबरोबर जाण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांची होती. त्यांनी मला तासन् तास समजावण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगितले, तुम्हाला जायचे तर जा. त्यानंतर २००४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला. भाजपचे सरकारही आले नाही. तरीही पराभव झालेल्या प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद दिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आमची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याची होती. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र बैठक घेऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला होता. आज जे बोलत आहेत, ते त्यावेळी निर्णय प्रक्रियेत होते आणि मंत्रिमंडळातही सहभागी झाले होते, असा पलटवार शरद पवारांनी अजित पवार गटावर केला.आम्ही भाजपविरोधात भूमिका घेत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर त्यांच्याबरोबर जाणे, ही जनतेची फसवणूक ठरली असती, असेही पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा  #NCP (Sharad Chandra Pawar): राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ

‘एकनाथ खडसे कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायला तयार असतात. त्यांना उद्या सांगितले, की निवडणुकीला उभे रहा. ते लगेच कामाला लागतील. पण मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांची प्रकृती विचारात घ्यावी लागेल. त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या उमेदवारीचा निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love