पुणे–विरोधकांना काविळ झाल्याने सर्व काही पिवळेच दिसत आहे. त्यातूनच त्यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका होत आहे. मात्र, आत्मविश्वास वाढविणारे हे बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वाहतूक विभागातील पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्मयात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलीस करवंदे यांची कासारवाडी येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दरेकर म्हणाले, पोलिसांवर होणारे हल्ले ही लज्जास्पद बाब आहे. जो आपल्या सुरक्षेची काळजी घेतो, आज त्याच पोलिसांची सुरक्षा धोक्मयात आली आहे. ही आपल्याला शोभा देणारी गोष्ट नाही. यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही. आता ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. व्यवस्थेवर नीट लक्ष देऊन समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची पुन्हा हिंमत होणार नाही, अशा कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.