जर मोदीजींनी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार – चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे –आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्ती करत नाही असा असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच असेही ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लसीकरणाच्या ठिकाणी जाणे शक्य नसलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याचा उपक्रम या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केला, त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वाघाशी मैत्री होत नसते असे विधान केले होते. तसेच आज चंद्रकांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील एका कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक अनुज खरे यांनी चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्याचा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना हा चिमटा काढला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते.  मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठाकरे-मोदी भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटील म्हणाले,  “दोन व्यक्तींची भेट झाली त्यात काय चर्चा झाली ते आपल्याला कसं समजणार”, असं ते म्हणाले. शिवाय 12 आमदारांचा प्रश्न मोदींचा नव्हे तर राज्याचा असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावरुन दिशाभूल

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.

वाढदिवसानिमित्त मला मनाविरुद्ध का होईना संजय राऊत यांनी शुभेच्छा देत गोड म्हटले आहे, कारण मनातून गोड असतो तर दर आठवड्याला सामनातून माझ्यावर एक अग्रलेख असतो तो लिहिला गेला नसता, असा टोला लगावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. अजित पवार यांना संजय राऊत यांचा वाण नाही पण गुण लागला, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.

स्वबळावर निवडून येऊ

राज्यात महाविकास आघाडीवर टीका करत, वेगवेगळे लढा कोण नंबर वन ते कळेल, असे पाटील म्हणाले, अजूनही माझे आव्हान आहे, वेगवेगळे लढा कोणता पक्ष मोठा हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील निवडणुका स्वबळावर जिंकू हा माझा वाढदिवसाचा संकल्प आहे असे सांगत, मुंबई महापालिकेत 20 वर्षे सेनेचे राज्य आहे. राज्यात दीड वर्ष सत्ता आहे. 40 हजार कोटींचे बजेट असतं. परंतु कामं होत नाहीत. येणाऱ्या निवडणुकात लोक जागा दाखवतील, आमचे संघटन मजबूत तयार केले आहे, वाढदिवसानिमित्त मजबूत संघटन करण्याचा आणि स्वबळावर निवडणुका जिकण्याचा निर्धार असल्याचे पाटील म्हणाले .

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *