बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची करोडोची लूट : विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे -मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपाने पुनवर्सन संपादित जमीनीवरील इतर अधिकारात असलेले पुनवर्सनाचे शेरे कमी करण्याकरिता राज्यातील पुनवर्सन अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करत शेतकरी बाधंवाकडून करोडोची लूट करताना दिसत आहेत. असा आरोप करत 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पुनवर्सनाचे शेरे घोटाळा प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार असल्याची शक्यता असल्याने, पुनवर्सन घोटाळा तपासामध्ये अडथळा येवू शकतो .त्यामुळे जो पर्यत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपाचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खांडरे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,  शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे हे उपस्थित होते.

५ ऑगस्टचा २०१९ चा शासन निर्णय झाल्यानंतर पुनर्वसन खात्यातील काही अधिकारी दलालांव्दारे हवेली व दौंड तालुक्यामधील त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातील पुनर्वसनवाधित शेतक-यांशी संपर्क करून एकरी ३ ते ४ लाख रूपयांची मागणी करून सदर शेरे कमी करून देतो अशी बतावणी करत होते. त्यांच्या अमिषाला बळी पडुन मौजे वाडेबोल्हाई ता. हवेली येथील एकुण २५ शेतकरी खातेदारापैकी १६ शेतकरी खातेदारांची ५७ एकर २७ गुंठे जमिनीवरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याकामी आर्थिक तडजोड करण्यात आली त्या अनुशंगाने भ्रष्ट्राचाराचे सुत्रधर विभागीय उपायुक्त, पुनर्वसन सुधीर जोशी यांच्याकडे  १६ शेतक-यांच्या वतीने ५७ एकर २७ गुंठे जागेवरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी ५ जुन २०२१ रोजी अर्ज दाखल केले गेले. विभागीय उप आयुक्त सुधीर जोशी यांनी या अर्जावर ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या शासन निर्णयाच्या कार्यपध्दतीचे उल्लंघन करत स्वतःच्या पदाचा दुरूपयोग  करून बेकायदेशीरपणे दिनांक २०.८.२०११ रोजी तहसिलदार हवेली यांना पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याबाबत आदेश दिले असा आरोप यावेळी करण्यात आला.

मौजे वाडेबोलाइ तालुका हवेली येथील 57 एकर 27 गुंठे क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याबाबत  आर्थिक तडजोड करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या विभागीय उपायुक्त पुनर्वसन सुधीर जोशी यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, सुधीर जोशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर भ्रष्टाचारात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत चौकशी करण्यात यावी, सदर घटनेची जबाबदारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी अॅड. धर्मेंद्र खांडरे आणि प्रदीप कंद यांनी केली.

ते म्हणाले, 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुनर्वसन अधिकारी कोणतीही शासकीय मान्यता न घेता जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवून अशा प्रकारे किती जमिनीवरील पुनर्वसनाचे शेरे  कमी केले गेले याची चौकशी करण्यात यावी, हवेली दौंड व खेड तालुक्यातील पुनर्वसन क्षेत्रावरील शेरे काढण्यासंदर्भात शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दाखल केलेले  प्रस्ताव लवकरात लवकर मिळवून क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शेरे तात्काळ कमी करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *