दार उघड उद्धवा दार उघड- भाजपचे घंटानाद आंदोलन


पुणे–गेल्या साडेचार महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे  उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आज भाजपच्या वतीने यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यातही शहर भाजपाच्य वतीने पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले.यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  

 भाजप कार्यकर्त्यांनी घंटनाद करत  उद्धवा अजब तुझे सरकार, दार उघड उद्धवा दार उघड, पुरे झाले पुरे झाले, मंदिरांची दारे खुली करा यासारख्या घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार घंटानाद करत निषेध नोंदवण्यात आला.

या आंदोलनाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपशहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अनेक भाजपा  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या वेळी राज्यसरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अधिक वाचा  स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत- निर्मला सीतारामन

 गिरीश बापट म्हणाले,राज्यात काही अपवाद वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार घ्यायला तयार नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीपासून धार्मिक स्थळांचे दर्शन घडलेले नाही.श्रावण महिन्यात देखील भाविकांनी संयम पाळत मंदिरांच्या दर्शनाचा हट्ट केला नाही. मात्र अजूनही मंदिरे खुल करण्यात येत नसल्यामुळे भाविकांची खूप मोठी नाराजी आहे. पण राज्य सरकारकडून भाविकांच्या भावनांची  कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.त्यामुळे भाजपकडून राज्यभर राज्य शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन पुकारणात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन तरी राज्य सरकारने भाविकांना दर्शनासाठी त्वरित मंदिरे खुली करून द्यावी.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्व धर्मस्थळे नागरिकांसाठी ताबडतोब खुली करावीत अशी मागणी   यावेळी केली. अन्यथा सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला यापुढे अजून प्रखर आंदोलन उभे करावे लागेल. तसेच सर्वसामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा ठाकरे सरकारने घ्यायचा प्रयत्न करू नये. जनतेचा धीर सुटला तर जनता स्वतः मंदिरे व सर्व धर्मस्थानांची कुलपे तोडायला उद्युक्त होईल असा इशारा   जगदीश मुळीक यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love