विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन : रुपाली चाकणकर


पुणे – गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी होत आहे. मात्र, याच मुद्यावरून राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्ष रुपाली चाकणकर यांनीही उडी घेतली आहे. सत्तेची दारे बंद झाल्याने राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून भाजप ने घंटानाद आंदोलन केले, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेले संकट टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार ते पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत.  राज्यातील मंदिरे खुली करावीत अशी मागणी विविध राजकीय विकती आणि मंदिरांच्या कडूनही केली जात आहे. या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपसह अनेक धार्मिक संघटना आणि संस्थाही सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकार मॉल, दारूची दुकाने उघडू शकतो तर मंदिरे उघडण्याला विरोध का? असा सवाल या आंदोलनातून सरकारला विचारण्यात आला होता.

अधिक वाचा  केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

त्यावर चाकणकर यांनी हे ट्वीट केले आहे.  मंदिर, मस्जिद, देव-देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. कोरोना महामारीचे संकट अखंड मानवजातीवर ओढवलेले असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love