gtag('js', new Date());
Image

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

Spread the love

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी  त्या सोडत नाही.

अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा केलेला दिसतो. त्यांनी त्यांचा चेहऱ्याला केकचे ठिपके लावलेला वाढदिवसाचा फोटो त्यांच्या ट्वीटर आणि फेसबूक या दोन्ही अकाऊंटवर शेअर करत ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !’ असा मजकूर त्यासोबत लिहिला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.  

अधिक वाचा  सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार आमनेसामने

काल त्यांनी ‘पहचान कौन’ या शीर्षकाखाली हिंदीमध्ये ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी

पहचान कौन?

एक राजा जो-

महल की चौखट से निकलता नही

अवाम से कभी मिलता नही

सत्य और कर्म की राह पर चलता नही

वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही

महामारी का कहर उससे सम्हलता नही

प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !

सच है, धोखा कभी फलता नही।

क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?

अधिक वाचा  हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार?--का म्हणाले असे उद्धव ठाकरे?

असे ट्वीट केले होते.

राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्या अनुषंगाने अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट केले होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the love सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

Spread the love

Spread the love पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 14, 2026

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

by News24Pune time to read: <1 min
0