भारतातील या कंपनीची आता नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस:


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात कोरोनावरच्या लसीचे संशोधन तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. लस अगोदर कोण बाजारात आणणार यावरून स्पर्धा सुरु असतानाच आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक कंपनी नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस विकसित करीत आहे. Bharat Biotech is developing a special nasal vaccine.

भारत बायोटेकने यासाठी अमेरिकेच्या सेंट लुईस St. Louis, USA येथे असलेल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनशी Washington University School of Medicine करार केला आहे. या लसिला ‘कोरोफ्लू’ Choroflu असे नाव देण्यात आले आहे.

अधिक वाचा  चीनमधून आयात थांबविल्यास मोठ्या आर्थिक त्सुनामीची शक्यता?

भारत बायोटेकने नमूद केले आहे की अमेरिका, जपान आणि युरोप वगळता सर्व बाजारपेठांमध्ये लस वितरित करण्याचे कंपनीला अधिकार आहेत.  या लसीच्या पहिल्या टप्प्यात सेंट लुईस युनिव्हर्सिटी युनिटमध्ये चाचणी घेण्यात येईल, तर नियामक मान्यता मिळाल्यानंतर भारत बायोटेक इतर टप्प्यांची  चाचणी भारतातही करेल.  

ही लस इंजेक्शनच्याऐवजी नाकामध्ये थेंब टाकून दिली जाईल. कोरोनो व्हायरससह इतर अनेक व्हायरस किंवा जंतू केवळ श्लेष्माद्वारे शरीरात प्रवेश करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे नाक, तोंड, फुफ्फुसे आणि पाचक प्रणालीत आढळलेल्या ओल्या ऊतींवर परिणाम करतात.

ही लस सहसा शरीराच्या वरच्या भागावर दिली जाते.  परंतु प्रत्येक विषाणूची स्वतःची प्रवृत्ती असते आणि कोरोना विषाणू आधीच्या व्हायरसपेक्षा वेगळा आहे. त्याच्यापासून संरक्षणासाठी आणि त्वरित परिणामासाठी, ही लस नाकातून थेट आतमध्ये प्रवेश करेल आणि थेट विषाणूवर हल्ला करेल आणि तिचा नाश करेल.

अधिक वाचा  वंध्यत्व समस्येवर उपाय; घराच्या घरीच इन-व्हिट्रो (कृत्रिम गर्भधारणा) उपचार पद्धती In-vitro (artificial insemination)

मागील अभ्यासात, ब्रिटिश संशोधकांनी असा दावा केला होता की लस इनहेलर किंवा अनुनासिक स्प्रे म्हणून कोरोनासाठी अधिक प्रभावी होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इम्पीरियल कॉलेजमधील शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की थेट फुफ्फुसांमध्ये औषध देणे ही एक चांगली पद्धत आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love