नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको – शरद पवार

India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon
India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

पुणे- भाजपशी (bjp) संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच, हीच आपली भूमिका आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट केल्यावर  पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी  शिवसेना(shivsena) (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह माध्यमांना सोमवारी फटकारले. (No means no; Don’t be too confused)

बारामतीत गोविंदबाग येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  दोन दिवसांपूर्वी त्यांची अजितदादा पवार यांच्यासोबतची बैठक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.  त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या शंका व्यक्त होत असताना पवार यांनी वरील भाष्य केले.

पवार म्हणाले, आमच्याकडून संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडीत आम्ही तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्यावर संभ्रम राहिलेला नाही. एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करू नका. मी जे सांगत आहे, तेच माझे मत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत:देशात विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावताना दिसतो आहे - शरद पवार

जयंतराव ठाम

जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करून ही पावलले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.  कालच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, टोमॅटोचे भाव वाढले, त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळत असताना, केंद्र सरकार नेपाळकडून टोमॅटो खरेदी करत आहे. शेतकरी उत्पादक आहे, त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर त्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याला यातना कशा देता येतील, ही भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. अशा प्रकारे टोमॅटो आयात करणे, हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अधिक वाचा  आयोग मुदतीवर काम करत नाही : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचे स्पष्टीकरण

दरम्यान,अजित पवार आणि शरद पवारांच्या या भेटीमुळे  मविआमध्ये धूसफुस वाढू शकते. लोकांच्या मनातही संशय आणि संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारचे नेतृत्व निदान भीष्मपितामह यांच्याकडून होता कामा नये, असा सल्ला देत यातून संशय आणि संभ्रम निर्माण होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर पवारांनी तुम्हीच संभ्रम वाढवू नका, असे सुनावले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love