काही लोकांचा बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय – अजित पवार

राजकारण
Spread the love

पुणे–काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही असे सांगत मुंबईतील बॉलिवुड बाहेर जाऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली नाटकाची तिसरी घंटा आता वाजणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली. अजित पवारांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य हे सरकार करेल आणि सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल असे सांगितले.

अजित पवार म्हणाले, कोल्हापूरच्या चित्रपटनगरीमध्ये सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. मुंबईच्या फिल्मसिटीमध्येही अधिकच्या सुविधा देता येतील. कारण काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण इथेच इतक्या चांगल्या सुविधा देऊ. जेव्हा पासून चित्रपटसृष्टी सुरु झालेली आहे तेव्हापासून संपूर्ण देशाचे केंद्र मुंबई आहे. ते मुंबईच राहावं ते महाराष्ट्रातच राहावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे. त्याकरता महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल.

 नाट्यगृह आणि चित्रपट गृहांमध्ये  सध्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी आहे.. कॉलेज, शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या नंतर अंदाज परिस्थितीचा अंदाज घेऊन शंभर टक्के आसन क्षमतेने परवानगी दिली जाईल असे सांगून पवार यांनी दिलासा दिला.  सगळीकडे करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे परिस्थिती सुधारत आहे. त्याला धक्का लागून आपल्याकडून चुका होऊन तिसरी लाट येऊ नये ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. आम्हाला सरकार चालवताना हे बंद करा ते बंद करा असे अजिबात आवडत नाही. सगळ्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *