पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही – अजित पवार


पुणे- पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पहिला विषय जम्बो कोविड सेंटरचा निघाला. त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झालं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले. त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतलं नव्हतं. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार,  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त  सुहास दिवसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आदींचा या कामात सहभाग होता. त्यांना पारदर्शकपणे काम करण्यास सांगितलं होतं. आजच्या मिटिंगमध्ये हाच विषय पहिला घेतला. या बैठकीत सर्व माहिती मिळाली. ती समजून घेतली. त्यासंदर्भात एक नोट तयार करण्यास सांगितलं आहे. ती नोट मध्यमानांही देऊ असे सांगत या कोव्हिड सेंटरमध्ये काही चुकीचं झालं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या