२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल- चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे—पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi )यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करण्याची गरज नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrkant patil ) व्यक्त केला.

ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती ही खोटं बोल पण रेटून बोल अशी झाली असल्याचे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वेदांत फॉक्सकॉन विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis )यांनी स्पष्ट मांडणी केली आहे. पण, महाविकास आघाडीचे नेते तेच तेच बोलून जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जळगाव येथील आणि आदित्य ठाकरे यांची सिल्लोड येथील सभा रद्द झाल्याने शिंदें- फडणवीस सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. याला प्रतिउत्तर देत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेचा गैरवापर केला. त्याची यादी काढली तर दिवस पुरणार नाही. सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली तरी पोलीस ठाण्यात घेऊन जायचे. घरात घुसून मारत होते हे ते विसरले आहेत का? त्यांनी सत्तेचा अडीच वर्षे दुरुपयोग केला आहे. असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले आहे.

संजय राऊत यांची काढली अशी आठवण

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चंद्रकांतदादांनी एक मिश्कील टिप्पणी केली. ‘पुढे जाण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे प्राचीन काळात पुष्पक विमान होते. त्याकाळचे ते संशोधन होते. त्यावेळी संजय धृतराष्ट्राला सांगायचे’ अशी माहिती चंद्रकांत पाटील व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांना देत होते. ‘संजय म्हणजे तुम्हाला संजय राऊत वाटतील. तेही भरपूर काही सांगायचे. मात्र, पुढे काय गडबड झाली, हे सर्वांना माहिती आहे’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. संजय धृतराष्ट्राला सांगायचे आणि त्यांना सर्व माहिती व्हायचे ही एक प्रकारे इंटरनेटची सोय होती, अशी जोडणीही पाटील यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *