कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट


पुणे-अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे. आपल्या ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “ रूग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदु:ख विसरून अहोरात्र रूग्णसेवा करणा-या डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला ह्या फोटोव्दारे वाहिलेली ही आदरांजली आहे.” 

अधिक वाचा  #Anil Kapoor : दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये अनिल कपूर ठरले 'ॲनिमल' चित्रपटातील "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता"

नवरात्री फोटोशूट करण्याची संकल्पना तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत आणली. आता अनेकजणं वेगवेगळ्या रूपांमधली फोटोशूट करत असतात. 2017 पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते. तेजस्विनी ह्याविषयी सांगते, “2017 ला आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि एक फोटोशूट केलं. सोशल मीडियावर फोटो येताच अनेकांनी पाठ थोपटली. आता तर ‘नवरात्रीत काय घेऊन येणार’ अशी चाहत्यांकडून आवर्जून विचारणा होऊ लागलीय. त्यामूळे हुरूप येतो आणि एक जबाबदारीचीही जाणीव असते. प्रत्येक वर्षी मी त्यावेळी मनात जे काही खदखद असते, ते नवरात्री फोटोशूटमधून व्यक्त होते, ह्या फोटोशूटमागे अर्थातच माझ्या टिमचा खूप सपोर्ट असतो.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love