gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती
Image

कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

Spread the love

मुंबई-कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न,  ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. कोण होणार करोडपती च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघीं मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी) या संस्थेसाठी हा खेळ खेळणार आहेत. हा विशेष भाग येत्या शनिवारी ११ जून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर  प्रसारित होणार आहे.   

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ह्या दोघी सहभागी होणार आहेत. या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत,काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक,दिग्दर्शक निरंजन अय्यंगार आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागात उपस्थित असणार आहेत. काजोलला बाजिगर च्या सेटवर शाहरूख खान का ओरडला होता, तनुजा यांच्या लग्नाची बेडी या नाटकाचे अनुभव; अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग रंगलेला असल्याने प्रेक्षकांसाठी विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

अधिक वाचा  फुकटची बिर्याणी महिला डीसीपीला पडली महागात : व्हायरल ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

कोण होणार करोडपती च्या या पर्वातही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींचीभेट आणि त्यांचे कार्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातील पहिल्याच आठवड्यातील विशेष भागात विशेष पाहुणे म्हणून तनुजा आणि काजोल या सहभागी होणार आहेत. मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी)या संस्थेसाठी या दोघी ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार आहेत.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हीट होतो, अशी अफवा सिनेमा क्षेत्रात अनेक वर्षं आहे; त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

राज ठाकरे यांचा घणाघात : “जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात” :

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप

Spread the love

Spread the love पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

by News24Pune time to read: <1 min
0