The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow

#SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून(दि.३१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

SSC Exam Hall Ticket :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे (SSC Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उद्यापासून (३१ जानेवारी)  ऑनलाईन(Online) पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना(Students) त्यांच्या शाळेमधून(School) प्रवेश पत्र डाऊनलोड(Download) करून दिले जाणार आहेत. प्रवेश पत्र(Hall Ticket)  देताना शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक(Anuradha Oak) यांनी दिल्या आहेत. (The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow)

राज्य मंडळाच्या माध्यमातून नऊ विभागीय मंडळाअंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च २०२४  मध्ये घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्कूल लॉगिन मधून शाळा हे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकतात. हॉल तिकीट ओपन करताना काही त्रुटी किंवा एरर आल्यास गुगल क्रोमा मध्ये ते ओपन करावे.

प्रवेश पत्रात विषय व माध्यम यामध्ये बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायच्या आहेत. प्रवेश पत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. सदोष फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळांनी त्याला पुनश्च प्रिंट आऊट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे, असे राज्य मंडळातर्फे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *