A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

भाजपचा गुंडांना राजकीय आश्रय : आमदार रवींद्र धंगेकर यांची आरोप

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Ravindra Dhangekar –ड्रगमाफिया ( Drug mafia) ललित पाटील प्रकरणाचा (Lalit Patil Case) तपास सुरू आहे की बंद झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे (Sasoon Hospital) तत्कालीन अधिष्ठाता(Dean) डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur) यांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही ?त्यांना सह आरोपी का केले नाही? या प्रकरणात सहभागी असलेल्या कारागृह प्रशासनाची चौकशी का झाली नाही ?यात सहभागी असलेल्या आणखी बड्या अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची नावे का समोर आले नाहीत, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी उपस्थित केला. भाजपचा(bjp) गुंडांना राजकीय आश्रय ( political asylum) मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (BJP’s political shelter to gangsters)

पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) रितेश कुमार(Ritesh Kumar) यांची भेट घेऊन धंगेकर यांनी डॉ. ठाकूर यांच्यावर अटक कारवाईची मागणी केली आहे. धंगेकर म्हणाले, पोलिसांवर जनतेची सुरक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील पोलीस योग्य ती जबाबदारी पार पाडत नसतील, तर ते अयोग्य आहे.

दोषींवर कारवाई झाली नाही, तर लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

भाजपचा गुंडांना राजकीय आश्रय

पुण्यातील कोथरूड परिसरात गुंड शरद मोहोळ याच्यावर भरदिवसा गोळीबार करून त्याचा खून घडल्याची घटना घडली आहे .वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे ‘अशांत कोथरूड ‘अशी ओळख निर्माण झाली आहे .कोथरूडमध्ये अनेक महत्त्वाच्या औद्योगिक ,सामाजिक ,शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. शिक्षणासाठी राज्यातले तसेच वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तसेच अनेक साहित्यिक, कलावंत या भागात राहत असल्याने कोथरूडची एक वेगळी ओळख आहे. मात्र, या भागात गुन्हेगारी वाढल्यामुळे  गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहे. या गुन्हेगारांना भाजपचा राजकीय आश्रय मिळू लागल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. त्याचप्रमाणे मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा बसावा आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यादृष्टीने पोलिसांनी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे, अशी मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे धंगेकर यांनी यावेळी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *