गलिच्छ भाषण करणाऱ्या मंत्र्यांवर मोदींनी कारवाई करावी- सुप्रिया सुळे

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

पुणे–‘नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीनी काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, असा टोलाही त्यांनी लंगावला.

सुप्रिया सुळे पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान एक वक्तव्य केलं यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी यावेळी आक्रमक प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा  शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करणे हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली

‘नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे, त्याबाबत मोदींनी काहीतरी करावाई करावी राजकारण होत राहील, पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गेल्या वेळेस मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं हे थांबलं पाहिजे. त्यांचा मी निषेध करते.  माझी अपेक्षा आहे मोदी यांचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे अशी भाषा थांबली पाहिजे अशा व्यक्तींवर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी  केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love