शरद पवार यांनी का नाही घेतले मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन?


पुणे- काही दिवसांपूर्वी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान, आज (शुक्रवार) शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले असतानाच शरद पवार यांनी मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच गणपतीचे मुखदर्शन घेतले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. मंदिर परिसरात येणा-या भाविक महिलांकरीता स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, प्रथमोपचार सुविधा परिसरात कशा प्रकारे उपलब्ध होईल, याविषयी यावेळी चर्चा देखील झाली. त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शरद पवार यांनी गणरायाचे मुखदर्शन घेतले.

अधिक वाचा  निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे परत आले नाही म्हणून राज्य अस्थिर करण्यासाठी सत्तेचा गैरवापर -शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. रोज कोणत्या न कोणत्या विषयामुळे शरद पवारांचं नाव समोर येतच आहे. मग राज ठाकरेंची सभा असो, केतकी चितळेची पोस्ट असो किंवा ब्राह्मण संघटनांची भेट असो. आज पुन्हा एकदा शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार म्हणून चर्चेत आले होते.

शरद पवार यांनी मंदिरात जाऊन दर्शन का घेतले नाही?

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाडयाची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले.

भिडे वाड्याच्या पाहणीसाठी शरद पवार येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्त मंडळींना मिळाली. त्यानंतर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा आग्रह त्यांच्याकडून करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी भिडे वाडयाची आणि मंदिर परिसराची बाहेरून पाहणी केली आहे. मात्र ते मंदिरामध्ये गेले नाहीत.

अधिक वाचा  त्यांनी कुणाकुणाची जात काढली ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे- कोणाला म्हणाले राजू शेट्टी असे?

पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love