Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm Narendra Modi), ‘मोदी की गॅरंटी'( Modi’s guarantee) अशी जाहिरात करतात, पण त्यामधील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टिका जेष्ठ नेते शरद पवार(Modi’s guarantee) यांनी शनिवारी केली. तसेच ईडी (ED), सीबीआय(CBI) आदी तपास यंत्रणाचा वापर करून लोकशाहीच्या (Democracy )मूल्यांवर घाव घालणाऱ्यांना सत्तेतून दूर करता यावे यासाठी इतर सर्व विचारधारा जागृत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडीच्या (इंडीया प्रंट) कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस भवन येथे पार पडला. यावेळी पवार हे मार्गदर्शन करीत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क नेते सचिन आहेर, आप चे मुकुंद किर्दत, कामगार नेते अजित अभ्यंकर, खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत हांडोरे, आमदार रवींद्र धंगेकर, संजय जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात यापूर्वी अनेक राज्यकर्ते झाले. पण त्यावेळी संविधानाची चिंता कधी वाटली नाही, सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे कधी वाटले नाही. पंतु गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या कालावधीत देशाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेले, देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱयांविषयी मन दूषित करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरु आहे.
हा देश कृषी प्रधान असूनही वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांकडे केंद्र सरकारने पाहिले नाही. जर शेतकऱयांची काळजी या सरकारला नसेल तर त्यांना दूर करण्यासाठी सामूहिक शक्तीची आवश्यकता आहे, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.
पटोले म्हणाले, केंद्र सरकार केवळ घोषणा करते आणि हीच त्यांची गॅरेंटी आहे. आधी आरोप करायचे आणि नंतर संबंधितांना सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचे असा कार्यक्रम सरकारचा आहे. हे वर्ष निवडणूकीचे आहे. म्हणजेच केवळ घोषणा करणारे सरकार जाण्याचे वर्ष आहे. हीच त्यांची केवळ गॅरेंटी आहे. शेतकऱयांचे प्रश्न सुटले नाहीत. तर, दुसरीकडे महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही. हे सरकारचे अपयश आहे. याबद्दल जाब विचारला जाणार आहे. देशातील लोकशाही आबाधित ठेवण्यासाठीच महाविकास आघाडी आगामी निवडणूका एकत्रितपणे लढणार आाहोत. येणाऱया निवडणूकीत इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल.
धनगर, मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले नाही. ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे. या देशाचे संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे असे पटोले यांनी स्पष्ट केले.
हंडोरे म्हणाले, शेतकऱयांच्या प्रश्नाबरोबरच शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही. त्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. हीच केंद्र सरकारची गॅरेंटी आहे का? सर्वसामान्य जनतेची हे सरकार दिशाभूल करत आहे.
सुळे म्हणाल्या, आगामी काळात सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन मुद्यांवर महाविकास आघाडी काम करणार आहे. कारण सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा, त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्याचे काम केले जाणार आहे. केंद्र सरकार एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करतात, कारवाईची भीती दाखवतात पण, तीच मंडळी सत्तेमध्ये सहभागी होतात हे न उलगडणारे कोडे आहे.