आमदार मुक्ता टिळक यांचे निधन : उच्च शिक्षित राजकारणी


पुणे—पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक (mukta tilak) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (MLA Mukta Tilak passed away) त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी (cancer) झुंज देत होत्या. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली.

उद्या (शुक्रवारी) सकाळी ९ ते १० या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सौ. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९  या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक यांना मोठा वारसा लाभला होता. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या. उच्च शिक्षित मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौरही राहिल्या होत्या. विशेष म्हणजे भाजपच्या सत्तेतील त्या पहिल्या महापौर होत्या.

अधिक वाचा  दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेतच

उच्च शिक्षित राजकारणी

मुक्ता टिळक यांचं शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी मानसशास्त्र या विषयातून एमए केलं आहे. शिवाय जर्मन भाषेचं शिक्षणही घेतलं . तसेच त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीएही होत्या.. शिवाय त्यांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलेलं होत. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं.

मुक्ता टिळक यांच्या माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांच्यावर संघाचे संस्कार होते. टिळक घराण्यात आल्यावरच आपसूकच त्यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही समाजकारणातून झाली. त्यांनी वॉर्डातील छोट्यामोठ्या समाजिक कामांना प्राधान्य दिलं. लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. त्यातच भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि २००२ मध्ये मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिकेत अशा प्रकारे त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा पालिका निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. महापौरपदापूर्वी त्यांनी पालिकेतील गटनेत्या म्हणून यशस्वीपणे जबाबदारी हाताळली आहे. स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या. आता त्या गिरीश बापट यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात.

अधिक वाचा  अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पक्षातील ज्येष्ठ नगरसेविका म्हणून मुक्ता टिळक यांच्याकडे महापौरपद गेलं होतं. मुक्ता टिळक महापौर झाल्यानंतर सव्वा वर्षाचं महापौरपद अडीच वर्षाचं करण्यात आलं. त्यातच विधानसभा निवडणूक लागल्याने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे भाजपच्या सत्तेतील पहिल्या महापौर असतानाच सर्वाधिक काळ महापौरपदी राहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. प्रदीर्घ काळ पुणे महापालिका गाजवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा २०१९  मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. कसबा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयीही झाल्या होत्या.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love