अभाविपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड


पुणे- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) २०२२-२०२३ या वर्षासाठी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.

यावर्षीचे अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश अधिवेशन दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात भाषण, चर्चा, प्रस्ताव असे विविध सत्र होतील. सोबतच, वर्ष २०२२-२०२३ साठीची नविन कार्यकारीणी घोषित होईल. प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) व अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची वर्ष २०२२-२३ साठी अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. या अधिवेशनात ते आपला पदभार स्वीकारतील.

प्रा. निर्भयकुमार दत्तात्रय विसपुते मूळ भडगांव (जि. जळगांव) चे कार्यकर्ते आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण ‘सेंद्रिय रसायनशास्त्र’ (Organic Chemistry) विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc.) तसेच ‘शिक्षणशास्त्र’ विषयात पदवी (B.Ed.) पर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते सांगली येथे ‘मातोश्री सायराबाई चंपालाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय’ येथे रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे कार्य करतात. ‘नाटक’ (थिएटर) विषयात विशेष रुची आहे.

अधिक वाचा  'वीर सावरकर वेबसिरीज' सावरकर विरोधकांच्या टीकेला उत्तर असेल- सात्यकी सावरकर

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे सलग चार वर्षे पारितोषिक प्राप्त. ‘शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर’ अंतर्गत ‘नाट्यशास्त्र पदविका’ अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. तसेच ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’चा ‘योगशिक्षक पदविका’ अभ्यासक्रम पूर्ण. वर्ष २००० मध्ये, तत्कालीन ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’, जळगावच्या ‘विद्यापीठ विद्यार्थी परिषदे’चे निर्वाचित अध्यक्ष राहिले आहेत.

१९९३ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात आहेत. १९९७ ते १९९९ पूर्णवेळ काम केलं आहे. नांदेड शहर संघटन मंत्री, नांदेड जिल्हा संघटन मंत्री, सांगली जिल्हा प्रमुख, कोल्हापूर विभाग प्रमुख, राष्ट्रीय कलामंच महाराष्ट्र प्रदेश सहप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध दायित्वांचे त्यांनी निर्वहन केले आहे. सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशी जबाबदारी आहे. वर्ष २०२२-२३ साठी त्यांची अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे. त्यांचा निवास सांगली येथे आहे.

अधिक वाचा  अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

अॅड. अनिल हरिभाऊ ठोंबरे मुळचे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तुंग गाव येथील आहेत. त्यांचे शिक्षण श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे येथून विधी शाखेच्या पदव्युत्तर पदवीचे सुरु आहे. ते २०१४ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक शुल्क वाढ, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, DTE प्रवेश प्रक्रिया, महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कायद्यात केलेले बदल, विद्यापीठातील मुलभूत सोयीसुविधा, अभियांत्रिकी व विधी विद्यार्थ्यांच्या निकाल व विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ अशा विद्यार्थी हिताच्या समस्यांसाठी केलेले ‘जागरण गोंधळ’, ‘अॅम्ब्युलन्स आंदोलन’, तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश रद्द, विद्यापीठातील पेपर फुटी प्रकरण दोषींवर कारवाई करण्यात यावी या विद्यार्थी हिताच्या समस्यांसाठी ‘लोटांगण आंदोलन’ व ‘पैसा दान करो आंदोलन’, शिष्यवृत्ती समस्यांना घेऊन समाजकल्याण कार्यालय, पुणे येथे ‘आक्रोश मोर्चा’ व लावण्या प्रकरणात तामिळनाडू सरकारच्या दडपशाही विरोधात निदर्शने अशा विविध आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

अधिक वाचा  इन्फ्रा.मार्केटचा पुण्यात एएसी ब्लॉक प्लांट सुरू 

कोरोना काळात पूर्वोत्तर भारतातील विद्यार्थ्यांना अन्न धान्य पुरवठा करणे असेल तसेच कोविड सेंटर वर आरोग्य मदत देणे अशा विविध सेवा कार्यात अग्रेसर राहिले आहेत. प्रसार माध्यमांवर विविध विषयात अभाविपची भूमिका मांडण्यात अग्रेसर राहिले आहेत. शहरी नक्षलवाद या विषयात अभ्यास व भारतीय संविधान या विषयात विशेष रुची आहे. यापूर्वी पुणे महानगर मंत्री, महाराष्ट्र प्रदेश मीडिया सहसंयोजक, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, केंद्रिय कार्यसमिती सदस्य अशा विविध दायित्वांचे त्यांनी निर्वहन केले आहे. सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अशी जबाबदारी आहे. वर्ष २०२२-२३ साठी त्यांची अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड झाली आहे. त्यांचा निवास पुणे येथे आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love