कसबा- चिंचवड पोटनिवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला : कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ?

पुणे(प्रतिनिधि)–कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज ( गुरुवार दि. २ मार्च) रोजी होत आहे. दरम्यान, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या दोन्ही मतदार संघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कसबा मतदार संघात भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार हेमंत रासने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी निकालाअगोदरच आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे लावलेले […]

Read More

पोटनिवडणूक मतदानाची अंतिम टक्केवारी कसबा : 50.06 टक्के चिंचवड : 50.47 टक्के

पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत […]

Read More

कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात […]

Read More

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान : शेवटच्या दिवशीही आरोप -प्रत्यारोप : धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी – भाजपने का केली मागणी?

पुणे–कसबा (kasba) आणि चिंचवड (chinchvad) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (२६ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कसब्यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक(mukta tilak) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत […]

Read More

डॉ. बाबा आढाव यांची धंगेकर यांनी भेट घेऊन घेतले आशीर्वाद

पुणे- कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज ज्येष्ठ नेते व समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची घरी जाऊन सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र किराड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे होते. सध्या परीस्थित रवींद्र धंगेकर […]

Read More

भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ- सचिन अहिर

पुणे – कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार […]

Read More