पुणे—मराठा आरक्षणाला सर्वोच्च नायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झला आहे. त्यांना कुठल्या प्रवर्गात प्रवेश मिळणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्र लिहिले असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक अतिश काळे आणि परमेश्वर जाधव यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
एमपीएससीद्वारे ११ ऑक्टोबर आणि २२ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रित व इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. संबंधित परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाला स्थगिती देण्या पूर्वीची आहे. संबधित अर्जामध्ये एसईबीसी अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि एसईबीसी च्या आरक्षणावरील शासनाची भूमिका जाहीर न करताच एमपीएस्सीच्या परीक्षा घेण्याचा घात घातला आहे.
एमपीएससी च्या परीक्षा देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील मराठा गरीब विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून या स्पर्धा परीक्षा त्यांच्या भवितव्यासाठी मोठी संधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे मराठा समाजातील तरुण हताश व हतबल झालेला आहे. एकूणच सद्यपरिस्थिती संभ्रमाची व गोंधळाची झालेली आहे. अशा वातावरणात मराठा आरक्षणाविना परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे होईल म्हणून या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या परीस्खा रद्द न झाल्यास समाज भावना प्रक्षुब्ध होतील आणि ११ ऑक्टोबरला एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.